‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्‍ह्यातील नावे वगळण्‍यासाठी मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

करंजे येथे भटकी मळा परिसरात ३० जुलै २०२३ या दिवशी भूमीच्‍या वादातून परस्‍परविरोधी तक्रार विटा पोलीस ठाण्‍यात नोंद झाल्‍या होत्‍या. यातील सूर्यवंशी मळ्‍यातील पुरोगामी युवक संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष गोपीनाथ सूर्यवंशी आणि त्‍यांचे वडील भानुदास सूर्यवंशी यांची नावे ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्‍या अंतर्गत नोंदवण्‍यात आली होती.

सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

तुंग (सांगली) येथे विलंबापर्यंत मिरवणुका काढणार्‍या ३ मंडळ अध्यक्षांवर गुन्हा नोंद !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली होती. त्यानुसारच विसर्जन करण्याच्या सूचनाही आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे.

‘डीजे’च्‍या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्‍यू !

डीजे’सारखी मोठा आवाज करणारी ध्‍वनीयंत्रणा वापरून आपणच उत्‍सवांचे पावित्र्य नष्‍ट करत आहोत, हेही मंडळांनी लक्षात घेतले पाहिजे. त्‍याही पुढे जाऊन अशातून झालेल्‍या तरुणाच्‍या मृत्‍यूचे दायित्‍व आता कोण घेणार ?

‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण ! 

हे पठण श्री गणपति मंदिर येथे होईल. महिलांनी पठणासाठी येतांना आसन, पाण्याची बाटली आणि अथर्वशीर्ष पुस्तिका आणावी, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.

मिरजे येथे युवा अभियंत्याने श्री गणेशमूर्तीसमोर साकारला बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा !

थर्माकॉल आणि पुठ्ठे यांच्या माध्यमातून बनवलेली आकर्षक, नक्षीदार आणि कोरीव १२ मंदिरे लक्ष वेधून घेत आहेत. १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना आणि त्याचा महिमा देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

सांगलीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशीच महापालिकेकडून शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत !

संस्थांच्या मूर्तींसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते, हे ठाऊक असतांना महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेरीनाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांकडून संताप व्यक्त होत आहे.

डफळापूर (जिल्‍हा सांगली) येथील मूर्तीविक्रेत्‍यांकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट !

येथील मूर्तीविक्रेते श्री. रोहित वाठारे आणि श्री. आशिष मोहिते यांनी हिंदु, तसेच गणेशभक्‍तांना शास्‍त्र समजावे; म्‍हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री गणेशचतुर्थी विशेषांक प्रत्‍येक मूर्तीसमवेत भेट दिला. त्‍यांनी ४५० अंकांचे वितरण केले.

सांगली प्रशासनाच्‍या नियोजनशून्‍यतेमुळे गणेशभक्‍तांसमोर विसर्जनाच्‍या वेळी ‘विघ्‍न’ !

सांगली जिल्‍ह्यात पावसाने मारलेली दडी आणि पाटबंधारे विभागाने केलेले अक्षम्‍य दुर्लक्ष यांमुळे सांगलीत कृष्‍णा नदीत २० सप्‍टेंबरला केवळ १ फूट पाणी होते.

गणेशोत्‍सव आणि अन्‍य हिंदु सण परंपरांच्‍या संदर्भात शासनाने ठोस मार्गदर्शक सूत्रे घोषित करावीत ! – गिरीश जोशी, मूर्तीकार

शाडू मातीच्‍या श्री गणेशमूर्तींची मागणी वाढली !