‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण ! 

तासगाव (जिल्हा सांगली), २५ सप्टेंबर (वार्ता.) – येथील ‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने अनंतचतुर्दशी म्हणजेच गुरुवार, २८ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९.३० वाजता केवळ महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे. हे पठण श्री गणपति मंदिर येथे होईल. महिलांनी पठणासाठी येतांना आसन, पाण्याची बाटली आणि अथर्वशीर्ष पुस्तिका आणावी, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.