
सांगली – मिरज तालुक्यातील तुंग येथे विसर्जन मिरवणुकीच्या दिलेल्या समय मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी ३ गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत या मिरवणुका चालू राहिल्याने ही कारवाई करण्यात आली.
गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये तुंग येथील ‘संत रोहिदास शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळा’चे अध्यक्ष चिन्मय हंकारे, ‘शिवाजीनगर राजा मित्रमंडळा’चे अध्यक्ष राहुल गुरव आणि ‘शिवक्रांती मित्रमंडळा’चे अध्यक्ष वैभव कुंभोजे यांचा समावेश आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली होती. त्यानुसारच विसर्जन करण्याच्या सूचनाही आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे.
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !