देशी बियाणी साठवून स्‍वावलंबी होऊया !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८८

सौ. राघवी कोनेकर

‘आज ‘लागवड करण्‍यासाठी देशी बियाणी शोधणे’, ही काळाची आवश्‍यकता आहे. स्‍थानिक शेतकरी आणि पूर्वीपासून बागकामाचा छंद असणारे यांच्‍याकडे देशी बियाणी असू शकतात. अनेक संकेतस्‍थळांवरही देशी बियाण्‍यांची विक्री केली जाते. देशी बियाणी लावण्‍याने पुढील लाभ होतात.

अ. एकदा आपण एखाद्या भाजीचे देशी बियाणे लावले की, आपण त्‍यातील एखादे फळ झाडावरच बियांसाठी सुकवून पुढील लागवडीसाठी स्‍वतःचे बियाणे साठवू शकतो. असे केल्‍याने प्रत्‍येक वेळी नव्‍याने बियाणे विकत घ्‍यावे लागत नाही. घरगुती लागवडीसाठी बियाण्‍याची आवश्‍यकता अल्‍प असते. त्‍यामुळे एखादे फळ जरी बियांसाठी सुकवले, तरी इतरांनाही देता येतील, एवढ्या बिया मिळतात.

‘भाजीपाल्‍याच्‍या बियांची साठवण कशी करावी ?’, हे जाणून घेण्‍यासाठी मार्गिका पहा : bit.ly/41wWxwT

आ. भावी भीषण आपत्‍काळापूर्वी आपण देशी वाणांची (बियाण्‍यांची) साठवणूक आणि संवर्धन करण्‍यास आरंभ केला, तर बियाण्‍यांच्‍या संदर्भात स्‍वावलंबी झाल्‍याने पुष्‍कळ लाभ होऊ शकतो.

इ. देशी बियाणे हे चवीला उत्तम आणि आरोग्‍यासही चांगले असते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१७.२.२०२३)

तुम्‍हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्‍हाला कळवा !
[email protected]