प्रत्‍येक कुंडीत किंवा वाफ्‍यात पालापाचोळ्‍याचे आच्‍छादन करावे !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८५

सौ. राघवी कोनेकर

‘पालापाचोळ्‍याच्‍या आच्‍छादनामुळे मातीचा पृष्‍ठभाग झाकला जातो. तो झाकल्‍याने पुष्‍कळ लाभ होतात. या लाभांविषयी विस्‍तृतपणे जाणून घेण्‍यासाठी पुढे दिलेल्‍या मार्गिकेवरील लेख पहावा. ‘आच्‍छादन करणे (भूमी झाकणे)’, हा नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचा स्‍तंभ आहे. पालापाचोळा, वाळलेल्‍या काड्या, अशा आच्‍छादनासाठी उपयोगात आणल्‍या जाणार्‍या घटकांचे विघटन होत असल्‍याने काही कालावधीनंतर पुन्‍हा आच्‍छादन करावे लागते. एका वेळी अधिकाधिक चार ते साडेचार इंच जाडीचे आच्‍छादन केलेले चालते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.२.२०२३)

आच्‍छादनाचे लाभ जाणून घेण्‍यासाठी ♦ 
मार्गिका : bit.ly/3m1kUTi

तुम्‍हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्‍हाला कळवा !
[email protected]