लागवडीतील सुकलेली रोपे आणि वेली यांचा आच्‍छादनासाठी उपयोग करावा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८४

सौ. राघवी कोनेकर

‘लागवडीतील बहुतेक सर्वच फळभाज्‍या, वेलवर्गीय भाज्‍या यांचे आयुष्‍य ४ ते ६ मासांचे असते. ही रोपे आणि वेली सुकल्‍यावर त्‍यांचे सर्व अवशेष काढून आच्‍छादन करण्‍यासाठी (भूमी झाकण्‍यासाठी) किंवा कुंड्या अन् वाफे भरण्‍यासाठी त्‍यांचा उपयोग करावा. आपल्‍या लागवडीतील सुकलेले प्रत्‍येक रोप किंवा वेलीची एकही काडी टाकून न देता त्‍याचा पुनर्वापर करावा. हे सर्व अवशेष कुजून झाडांना जीवनद्रव्‍ये उपलब्‍ध करून देतात.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.२.२०२३)

तुम्‍हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्‍हाला कळवा !
ई-मेल : [email protected]