सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९१
‘परागीभवन म्हणजे नर फुलातील पुंकेसर मादी फुलातील स्त्रीकेसरांवर पडून फलधारणा होण्याची क्रिया. मिरची, वांगी, टोमॅटो, यांसारख्या झाडांना द्विलिंगी फुले असतात, म्हणजे एकाच फुलात स्त्रीकेसर अन् पुंकेसर असतात. अशा द्विलिंगी भाज्यांचे परागीभवन केवळ वार्याची झुळूक आली, तरी सहजतेने घडून येते. काकडी, दुधी भोपळा, दोडका, कोहळा, अशा वेलवर्गीय भाज्यांमध्ये मात्र नर आणि मादी फूल निरनिराळे असते. मादी फुलाच्या मागील बाजूस लहान आकाराचे फळ असते. परागीभवन यशस्वी झाले, तर ते मोठे होते. अशा भाज्यांत परागीभवन होण्याच्या प्रक्रियेत मधमाश्या, पतंग, फुलपाखरे, असे कीटक महत्त्वाची भूमिका बजावतात.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२२.२.२०२३)
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा ! |