लागवड करतांना ‘अनुभव हाच आपला गुरु आहे’, हे लक्षात घ्‍या !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८७

सौ. राघवी कोनेकर

‘लागवड करतांना आरंभीच्‍या काळात आपल्‍या मनात पुष्‍कळ शंका किंवा प्रश्‍न असतात. ते या विषयातील जाणकारांना अवश्‍य विचारावेत; परंतु सततच्‍या कृतीतून मिळणारा अनुभवच आपल्‍याला अधिक चांगले शिकवतो. प्रतिदिन झाडांची काळजी घेतांना निरीक्षण आणि होणार्‍या चुका यांमधून आपल्‍याला अनेक गोष्‍टी शिकायला मिळतात. वातावरणात होणारे पालट आणि त्‍यांचा झाडांवर होणारा परिणाम, यांतील बारकावे प्रत्‍येक ऋतूत निरनिराळे असतात. हे सर्व समजण्‍यासाठी काही काळ सातत्‍याने आणि चिकाटीने लागवडीचे प्रयत्न चालू ठेवावेत. निरनिराळे प्रयोग करत रहावेत. कालांतराने ‘अनुभव हाच आपला सर्वोत्तम मार्गदर्शक आहे’, हे आपल्‍या लक्षात येते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१६.२.२०२३)

तुम्‍हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्‍हाला कळवा !
ई-मेल : [email protected]