सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९२
‘रोपवाटिकेतून आणलेले रोप पिशवीतून कुंडीमध्ये लावतांना किंवा भाजीपाल्याचे लहान रोप कुंडीत किंवा वाफ्यात लावतांना शक्यतो संध्याकाळच्या वेळी लावावे. लहान रोप कुंडीत लावल्यानंतर त्याला भरपूर पाणी द्यावे. असे केल्याने रात्रभर गारव्यामध्ये त्या रोपाची मुळे नवीन ठिकाणी स्थिर होतात आणि जागा पालटण्याच्या धक्क्याने रोप सुकून जाण्याचा धोका अल्प होतो. ही कृती दिवसा केली, तर काही वेळा उन्हामध्ये लहान रोपांची मुळे नवीन जागेत स्थिरावण्यात अडचण येते आणि रोप सुकून जाण्याची शक्यता असते.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२२.२.२०२३)
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा ! |