देशी बियाणी लावावीत !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

लेखांक ८६

सौ. राघवी कोनेकर

‘आज अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेली ‘हायब्रीड’ बियाणी पेठेत सहज उपलब्ध आहेत; परंतु या बियाण्यांच्या उपयोगाने होणार्‍या लाभांपेक्षा होणारी हानी पुष्कळ गंभीर आहे. देशी बियाण्यांपासून मिळणारा भाजीपाला आरोग्यास लाभदायक आणि चवीलाही अधिक चांगला असतो. देशी बियाण्यांची लागवड केल्यास त्यापासून आपण पुढील लागवडीसाठी स्वतःचे बियाणे साठवू शकतो; परंतु हायब्रीड बियाण्यांपासून उगवलेल्या रोपांच्या बिया पुन्हा लावल्यास फारसे उत्पन्न मिळत नाही आणि प्रत्येक वेळी बीज उत्पादन करणार्‍या आस्थापनांकडून ते खरेदी करावे लागते. हायब्रीड बियाण्यांच्या सततच्या वापराने आज पुष्कळ देशी वाणे (बियाणी) नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘त्यांचे जतन आणि संवर्धन करणे’, हे आपलेच दायित्व आहे. देशी वाणे (बियाणी) मिळवून त्यांची लागवड होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.
(१३.२.२०२३)

‘हायब्रीड बियाण्यांचे दुष्परिणाम’ जाणून घेण्यासाठी पुढील मार्गिका पहावी : bit.ly/3xTdfcd