परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्‍चित आहे.

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्‍लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्‍लोक सुचवले.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पहिल्या भागात ‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावरील ‘वेबिनार’च्या आयोजिकेला जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पहिल्या, आज पुढील भाग पाहूया . . .

कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२०

‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

प्रेमभाव, साधनेतील सातत्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या पुणे येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७५ वर्षे) !

आज कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी, पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ईश्‍वरी बळवंत पाठक (वय ५ वर्षे) हिच्यावर सुसंस्कार होण्यासाठी तिची आई सौ. अर्पिता पाठक यांनी केलेले स्तुत्य प्रयत्न !

आज कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी कु. ईश्‍वरीचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्यावर आईने ‘सुसंस्कार होण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे येथे दिले आहे.

परम पूज्यांनी अंतरी लाविला व्यष्टी साधनेचा वेल । अन् सनातनचा वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ॥

त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष होऊनी पसरला जगांतरी ।
वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ।
त्याचा परिमल दरवळला त्रिभुवनी ॥

सांग देवा, तुझी सेवा कशी करू । कृष्णा, वासुदेवा, विठ्ठला ।

कृष्णा, कित्येक वेळा । नाचविलेस रे मला ।
भाव जागृत होता दिसे मज सावळी मूर्ती ।
सांग देवा, तुझी सेवा कशी करू ॥