‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
या वर्षी रविवार, २९.११.२०२० या दिवशी दुपारी १२.४८ पासून सोमवार, ३०.११.२०२० सकाळी ६.०३ वाजेपर्यंत कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र आहे. या योगावर कार्तिकस्वामींचे दर्शन घ्यावे. या दिवशी स्नान करून श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊन दर्भ, चंदन, फुले, दशांगधूप आणि दीप अर्पण करावा. श्री कार्तिकेय स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राला ‘प्रज्ञावर्धन स्तोत्र’ असेही म्हणतात. या स्तोत्राचे मनोभावे पठण केल्याने मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि बौद्धिक क्षमता वाढते. श्री कार्तिकस्वामींचे वाहन मयूर (मोर) आहे. त्याची पूजा करावी.
षडानन, मुरुगन, महादेवपुत्र, कार्तिकेय अशा विविध नावांनी श्री कार्तिकस्वामींना ओळखतात. दक्षिण भारतात श्री कार्तिकस्वामींची अनेक मंदिरे आहेत.
कार्तिकस्वामींची दर्शन स्थळे
१. पुणे येथे पर्वतीवर
२. आमराई विसावा जकात नाक्यामागे, पिरवाडी, सातारा.
३. अंभेरी घाट, ता. खटाव, जि. सातारा.
४. श्री क्षेत्रपाल नरोणा, आळंद, ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.
५. सिंधुदुर्ग जिल्हा – मुळदे, ता. कुडाळ आणि हिंदळे, ता. देवगड
६. राजापूर, जि. रत्नागिरी
७. रावणकोंड, गोवा
८. कोल्हापूर – पंचगंगेच्या तिरावर आणि श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात
९. साबरमती, गुजरात
१०. बळ्ळारी, कर्नाटक
या व्यतिरिक्त आपल्या गावी किंवा अन्यत्र असलेल्या कार्तिकस्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१८.११.२०२०)