सांग देवा, तुझी सेवा कशी करू । कृष्णा, वासुदेवा, विठ्ठला ।

श्री. सुधाकर जोशी

अज्ञानी मी ।
माझा भाव भोळा ।
तुझी पूजा कशी करू ॥ १ ॥

मंत्रहीन मी । क्रियाहीन मी ।
केशवा, तुझेच मी लेकरू ।
तुझी सेवा कशी करू ॥ २ ॥

बालपणीचा स्नेही भक्त सुदामा ।
त्याची भक्ती पाहून वसवलीस तू सुदामपुरी ।
पांडवाचा तू कैवारी ।
तुझ्या चरणी फुले अर्पण कशी करू ॥ ३ ॥

कृष्णा, कित्येक वेळा । नाचविलेस रे मला ।
भाव जागृत होता दिसे मज सावळी मूर्ती ।
सांग देवा, तुझी सेवा कशी करू ॥ ४ ॥

– श्री. सुधाकर केशव जोशी (वय ९१ वर्षे, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.६.२०२०) ​