साधकांची प्रज्ञा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही (प.पू. डॉक्टरांचे) असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्लोक सुचवले.

१. ॥ नमो श्री श्री जयन्ताय विष्णुरूपाय ॥
ध्यायेत् विष्णुं श्री श्री जयन्तं अमिततेजः
प्रीत्यानंदचैतन्यप्राप्त्यर्थं स्मरेत् तं मोक्षदं गुरुम् ।
आठवले-कुलोत्पन्नं गुरोः भक्तराजस्य शिष्यमोत्तमं
भजेत् तं श्रीमन्नारायणं श्रीशक्तिसहितं हरिम् ॥ १ ॥
अर्थ : प्रीती, आनंद आणि चैतन्य मिळवण्यासाठी श्री श्री जयंत नावाच्या महातेजस्वी अशा श्रीविष्णुरूपी मोक्षगुरूंचे ध्यान अन् स्मरण करावे. आठवले कुलात जन्मलेल्या, गुरु (प.पू.) भक्तराज महाराज यांच्या उत्तम शिष्याचे, श्री आणि शक्ती यांनी युक्त असलेल्या त्या हरीचे, श्रीमन्नारायणाचे (सतत) भजन करावे (भक्ती करावी).
‘देवा, तू जे सुचवलेस, ते मी लिहिले आणि तुला अर्पण केले. काही राहिले असेल, तर क्षमा करावी.
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।’
गुरुचरणी शरणागत,
– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१६)
(क्रमश: उद्याच्या अंकात)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426740.html
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !