सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठीच्या कार्यशाळा पार पडल्या !

कार्यशाळांमध्ये उपस्थित सर्व जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये साधनेविषयी श्रद्धा आणि तळमळ वाढण्यास साहाय्य झाले.

फोंडा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्यापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

श्रीमती सुधा सिंगबाळआजी सनातन संस्थेच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यावेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी सर्वांनी धर्माच्या बाजूने राहिले पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माेत्थानासाठी सेवारत आहेत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. सतीश महाना यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात रामराज्य स्थापनेचा निर्धार !

वाराणसी येथे हिंदूंचे संघटन होण्यासाठी चैत्र शुक्ल नवमी अर्थात् रामनवमी या पावन दिनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांनी सहभागी होऊन हिंदु एकतेचे दर्शन घडवले.

डाव्यांच्या शिक्षणपद्धतीमुळे आजची पिढी मोगलांनाच त्यांचे आदर्श समजत आहे ! – जगजीतन पांडेय, महामंत्री, अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षण मंडळ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसीमध्ये ३ एप्रिल या दिवशी ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. यात २० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

सनातनच्या इंग्रजी ‘ई-बूक’चे वाराणसी येथे लोकार्पण !

चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात वाराणसी येथील ‘अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडल’चे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांच्या शुभहस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्ट रिमूव्हल अँड इन्कलकेटिंग व्हर्च्यूज्’ या सनातनच्या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.

चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्ष साजरे करण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत !  – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !