हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे ‘राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन

डावीकडून पू. नीलेश सिंगबाळ, अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता, श्री. अशोक पाठक, बुद्धेश्वर महादेव पीठाधीश्वर योगीराज कुमार महाराज

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – लव्ह जिहाद, भूमी जिहाद, धर्मांतर, थूक जिहाद यांच्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधात भयंकर षड्यंत्र चालू आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून भारतात इस्लामी अर्थव्यवस्था उभी करून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे. वर्ष २०२५ नंतर सत्त्वगुणी हिंदूंकडून हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. समितीच्या वतीने स्थानिक सिव्हिल लाईनमधील हिंदुस्थानी अकॅडमीमध्ये ‘राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या अधिवेशनाला प्रयागराज, भदोही, प्रतापगड येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ८३ पदाधिकारी, अधिवक्ते, उद्योगपती आणि समाजसेवक सहभागी झाले होते. अधिवेशनाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने, तर समारोप ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आला.

राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी धर्माच्या बाजूने रहाणे, हे आपल्या सर्वांचे सामूहिक दायित्व ! – पू. नीलेश सिंगबाळ

हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने आयोजित मिरवणुकांवर जिहाद्यांनी आक्रमणे केली. अनेक ठिकाणांहून हिंदूंचे पलायन चालू झाले आहे. वाराणसीच्या बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या भिंतींवर ‘कश्मीर तो झांकी है, पूरा भारत बाकी है’, अशा राष्ट्रविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी धर्माच्या बाजूने रहाणे, हे आपल्या सर्वांचे सामूहिक दायित्व आहे.

बुद्धेश्वर महादेव पीठाधीश्वर योगीराज कुमार महाराज म्हणाले, ‘‘सर्वांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.’’

‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आधारे हिंदूंच्या अनेक गोष्टींवर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता, उच्च न्यायालय, प्रयागराज

धर्माचा अर्थ ‘रिलिजन’ नाही, तर ती एक पद्धती आणि संस्कार आहे. धर्मावर आक्रमण का होत आहे ? याचा आम्ही विचार केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेत धर्माला घटनात्मकरित्या हानी पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वर्ष १९७६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी षड्यंत्र रचून राज्यघटनेत ‘सोशालिस्ट’ (समाजवाद) आणि ‘सेक्युलर’ हे शब्द जोडले. या ‘सेक्युलर’ शब्दाच्या आधारे आमच्या अनेक गोष्टींवर प्रतिबंध लावण्यात येत आहे. आम्हाला या सर्वांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. यासाठी सर्व धर्माचार्यांनी संघटित झाले पाहिजे.

हिंदु राष्ट्र आमच्या अस्मितेचा प्रश्न ! – अशोक पाठक, अध्यक्ष, सनातन एकता मिशन

देशात बहुसंख्य लोकांवर अल्पसंख्यांक लोक दगडफेक करतात. हिंदु राष्ट्र आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. बहुसंख्यांकांच्या विरोधात नियम बनवले जाऊ शकत नाहीत, यासाठी आम्ही संकल्प केला पाहिजे.

हिंदुहिताच्या पत्रकारितेचे समर्थन करा ! – अनुपम मिश्रा, संपादक, प्रयागराज टाइम्स

हिंदुहिताची पत्रकारिता करणे अतिशय कठीण आहे. तशी पत्रकारिता करणे, हे संस्कृतीचे युद्ध आहे, जे मोगल काळापासून चालू आहे. त्यासाठी संघर्ष चालू ठेवा. डाव्यांचे षड्यंत्र नष्ट करण्यासाठी हिंदूंच्या हिताच्या पत्रकारितेचे समर्थन करा.

धर्मावरील आघाताच्या विरोधात स्थानिक स्तरावर प्रशासनाला निवेदन द्या ! – ठाकूर प्रकाश सिंह, अध्यक्ष, सनातन हितकारीणी न्यास, प्रतापगड

जेव्हा जेव्हा धर्मावर आघात होईल, तेव्हा तेव्हा स्थानिक स्तरावर प्रशासनाला निवेदन द्या. शरीयतमध्ये काय लिहिले आहे, याविषयी लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.

अधिवेशनामध्ये सहभागी हिंदुत्वनिष्ठ संघटना

सनातन एकता मिशन, अखिल भारतीय साहू समाज, शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वेद विद्यालय, माधोसिंह सेवा मंडल, जांबाज हिंदुस्थानी, सनातन हितकारीणी न्यास, भारतमाता की जय, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था

अधिवेशनाला उपस्थित संत, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते आणि उद्योगपती

बुद्धेश्वर महादेव पिबठाधीश्वर योगीराज कुमार महाराज, प्रयागराज येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता, सनातन एकता मिशनचे अध्यक्ष श्री. अशोक पाठक, ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा, प्रतापगड येथील ‘सनातन हितकारीणी न्यासा’चे अध्यक्ष श्री. ठाकूर प्रकाश सिंह