रशियाने युक्रेनी शहरांवर केलेल्या हवाई आक्रमणांत १३ लोक ठार !

युक्रेनी सैन्याला पाश्‍चिमात्य मित्रराष्ट्रांकडून नवे युद्ध साहित्य मिळाल्यानंतर ‘आम्ही रशियावर आक्रमण करणार’, असा सुतोवाच वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केला होता. त्यानंतर रशियाने ही आक्रमणे केली.

रशियाकडून भारताला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा ठप्प !

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून चालू केलेल्या युद्धानंतर अमेरिकेसह अनेक पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. आता रशियाने भारताच्या शस्त्रांंची आयात रोखली आहे.

युरोपने शहाणे व्हावे !

युरोपने अमेरिकेच्या मागे स्वत:ची फरफट करून घेऊ नये, असे विधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केल्यावर अमेरिकेला ते झोंबले आहे. ‘मॅक्रॉन हे जर संपूर्ण युरोपच्या वतीने बोलत असतील, तर अमेरिकेने केवळ चीनला रोखण्यावर लक्ष द्यावे आणि युक्रेनमधील युद्ध युरोपला हाताळू द्यावे’, अशी टीका एका अमेरिकन खासदाराने केली आहे.

बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात करण्याच्या रशियाच्या निर्णयाचा ‘जी ७’ देशांकडून निषेध !

अमेरिकेने युरोपमध्ये अनेक ठिकाणी परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. या तुलनेत रशियाने बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली, तर हे पाऊल परमाणुविषयीच्या कराराचे उल्लंघन ठरणार नाही-पुतिन

आम्ही युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे देणार नाही ! – चीन

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे.

रशियाकडून आम्हालाही स्वस्तात तेल घ्यायचे होते; पण त्यापूर्वीच आमचे सरकार पडले ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

भारताप्रमाणे आम्हालाही रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करायचे होते; पण ते खरेदी करता आले नाही. त्याचे कारण आमचे सरकारच पडले, असे विधान पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले.

पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावते ! – रशियाच्या माजी सुरक्षारक्षकाचा खुलासा

शिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावत आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते इतरांना ज्ञात नसलेल्या रेल्वेगाडीने प्रवास करतात.

रशिया भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ करणार !

या नव्या धोरणानुसार रशिया मित्र देश नसलेल्या आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.

रशिया बेलारूसमध्ये आण्विक शस्त्रे तैनात करणार !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शेजारील मित्र देश बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली आहे. ‘माझ्या या निर्णयामुळे अण्वस्त्र कराराचे उल्लंघन होत नाही. अमेरिकेने तिची अण्वस्त्रे इतर देशांमध्येही तैनात केली आहेत आणि आता आम्हीही तेच करत आहोत.