रशियाकडून आम्हालाही स्वस्तात तेल घ्यायचे होते; पण त्यापूर्वीच आमचे सरकार पडले ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताप्रमाणे आम्हालाही रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करायचे होते; पण ते खरेदी करता आले नाही. त्याचे कारण आमचे सरकारच पडले, असे विधान पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. यापूर्वी मे २०२२ मध्ये इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले होते.

दुसरीकडे पाकचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी दावा केला आहे की,  पाकिस्तान आणि रशिया यांच्यामध्ये करार झाला आहे. या अंतर्गत स्वस्त तेलाची पहिली खेप लवकरच पाकिस्तानला पोचेल.