अमेरिका भारत आणि रशिया यांच्यातील संबंध बिघडवू पहात आहे !  

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांचा आरोप !

प्रिगोझिन यांच्या काही चुका झाल्या असल्या तरी, ते एक प्रतिभावंत उद्योगपती होते ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया

प्रिगोझिन एक प्रतिभावंत उद्योगपती होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या, हे सत्य असले तरी, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यासाठी मला दु:ख आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘वॅगनर आर्मी’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.

ब्रिक्स’ संघटनेत आणखी ६ देशांचा समावेश होणार !

ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ५ देशांच्या ‘ब्रिक्स’ (बी.आर्.आय.सी.एस्.) संघटनेमध्ये आता आणखी ६ देशांंचा समावेश करण्यात येणार आहे. येथे चालू असलेल्या १५व्या ‘ब्रिक्स’ परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे मोठे यश ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून जगभरातून भारताचे अभिनंदन !

‘वॅगनर आर्मी’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू !

पुतिन यांना दिले होते आव्हान !

युक्रेनकडून मॉस्कोवर ड्रोनद्वारे आक्रमणाचा प्रयत्न ! – रशिया

हा प्रयत्न रशियाने हाणून पाडला. युक्रेनचे तिन्ही ड्रोन नष्ट करण्यात आले, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

‘लुना-२५’ यानाच्या अपयशामुळे रशियाचे शास्त्रज्ञ आजारी : रुग्णालयात भरती !

रशियाने चंद्रावर पाठलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. ही घटना स्वीकारता न आल्याने रशियाचे ९० वर्षीय शास्त्रज्ञ मिखाईल मारोव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले.

रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर कोसळले !

रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकॉसमॉस’कडून सांगण्यात आले की, १९ ऑगस्टला संध्याकाळी ५.२७ वाजल्यापासून त्याचा संपर्क तुटला होता. ‘प्री-लँडिंग’ (चंद्रावर उतरण्यापूर्वीची स्थिती) कक्षा पालटतांना तांत्रिक बिघाड झाला. 

७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केले भारताचे अभिनंदन !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले की, या विशेष दिवशी भारताला विशेष शुभेच्छा ! भारतासमवेत असलेले आमचे रणनैतिक सहकार्य आमच्यासाठी पुष्कळ महत्त्वपूर्ण आहे.

पाक रशियाकडून कच्चे तेल आयात करणे बंद करणार !

पाकिस्तानची निर्मिती द्वेषावर आधारित आहे. या द्वेषामुळेच या देशाचे अस्तित्व एक दिवशी संपवणार आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !