रशियाने केले ‘लुना २५’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण !

अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत ‘लुना २५’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

भारताच्या चंद्रयान ३ बरोबर स्पर्धा करण्यासाठी रशिया चंद्रावर ११ ऑगस्टला सोडणार ‘लुना २५’ यान !

अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न !

युक्रेनकडून रशियावर ड्रोनद्वारे आक्रमण !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, तसेच रशियावर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी भारतावरही दबाव आणला. आता युक्रेनकडून रशियावर आक्रमण केले जात असतांना मूग गिळून गप्प बसणार्‍या पाश्‍चात्त्य देशांना भारताने आरसा दाखवला पाहिजे !

मॉस्को येथे ड्रोनद्वारे होणारे युक्रेनचे आक्रमण उधळल्याचा रशियाचा दावा !

मॉस्को शहराचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी दावा केला, ‘येथे रात्री ड्रोनद्वारे २ इमारतींवर आक्रमण करण्यात आले. यात जीवित हानी झालेली नाही.

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष संतापले !

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा हे दोन दिवसांच्या पाकिस्तान दौर्‍यावर आहेत. संकटकाळात रशियाने पाकिस्तानला साहाय्य केले होते. अशा परिस्थितीत  युक्रेनच्या परराष्ट्रमत्र्यांच्या या दौर्‍यावर रशियाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत !

रशियाच्या सैन्यातील बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. युद्धासाठी पुतिन यांच्या अवास्तव मागण्या, सैन्यातील अडथळे आणि रशियन संरक्षण मंत्रालयाची अकार्यक्षमता, याला कारणीभूत आहे.

नेपाळी गुरखा रशियातील ‘वॅगनर गटा’च्‍या सैन्‍यदलात ?

भारतातील ‘फर्स्‍टपोस्‍ट’च्‍या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गुरखा योद्धे रशियामधील ‘वॅगनर गटा’मध्‍ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्‍याचे समोर आले आहे. ‘नेपाळी गुरखा रशियाच्‍या खासगी सैन्‍यदलामध्‍ये भरती झाल्‍याने भारतावर परिणाम होणार का ?’, याविषयीची माहिती या लेखात पाहूया.

रशियाचे खासगी सैन्य वॅगनर ग्रुप आणि त्याचे प्रमुख प्रिगोझिन गायब !

बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंके यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, प्रिगोझिन आणि त्यांचे खासगी सैन्य बेलारूसमध्ये नाहीत.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर या योजनेचा परिणाम दिसला, आपणही तेच करायला हवे ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया

भारत हा असा देश आहे, जो विदेशी आस्थापनांना भारतात काम करण्यास प्रोत्साहित करतो. आमचे खास मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा (केंद्र सरकारची एक योजना) प्रारंभ काही वर्षांपूर्वी केला होता.

वर्ष २०१४ मध्ये रशियाने नियंत्रणात घेतलेल्या युक्रेनच्या गावावर युक्रेनकडून  नियंत्रण मिळवण्यास प्रारंभ !

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा युक्रेनवर आक्रमण केले, त्यानंतर युक्रेन वर्ष २०१४ मध्ये रशियाशी झालेल्या युद्धाच्या वेळी रशियाने नियंत्रणात मिळवलेली युक्रेनी क्षेत्रे प्रथमच परत मिळवू लागला आहे, असे म्हटले जात आहे.