युरोपने शहाणे व्हावे !

युरोपने अमेरिकेच्या मागे स्वत:ची फरफट करून घेऊ नये, असे विधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केल्यावर अमेरिकेला ते झोंबले आहे. ‘मॅक्रॉन हे जर संपूर्ण युरोपच्या वतीने बोलत असतील, तर अमेरिकेने केवळ चीनला रोखण्यावर लक्ष द्यावे आणि युक्रेनमधील युद्ध युरोपला हाताळू द्यावे’, अशी टीका एका अमेरिकन खासदाराने केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्‍याविषयी अमेरिकेला रस का आहे ?

एक वर्षाच्‍या प्रदीर्घ काळानंतर रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धामध्‍ये कुणीही जिंकू शकलेले नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे. सध्‍याच्‍या लष्‍करी कोंडीमुळे वाटाघाटी करून युद्ध बंद करणे, हा एक उपाय आहे.

बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात करण्याच्या रशियाच्या निर्णयाचा ‘जी ७’ देशांकडून निषेध !

अमेरिकेने युरोपमध्ये अनेक ठिकाणी परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. या तुलनेत रशियाने बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली, तर हे पाऊल परमाणुविषयीच्या कराराचे उल्लंघन ठरणार नाही-पुतिन

व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधकाला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मुर्जा यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धावरून रशियावर टीका केली होती, तसेच त्यांनी रशियन सैन्याविषयी खोटी माहिती प्रसारित करून एका देशविरोधी संघटनेला समर्थन दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

आम्ही युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे देणार नाही ! – चीन

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे.

रशिया इस्लामिक स्टेटपेक्षा अधिक धोकादायक ! – युक्रेन

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्वीट करत म्हटले, ‘रशिया जो आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटपेक्षा वाईट आहे, तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे, हे किती विचित्र आहे.

भारताने शत्रूूंना ओळखून त्यांच्याशी वागावे !  

युक्रेनचा पाक आणि चीन यांचे नाव न घेता युक्रेनचा सल्ला

भारत खरोखरच जगाचा विश्‍वगुरु ! – युक्रेनच्या उपपरराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा

आज भारताला विश्‍वगुरु, वैश्‍विक शिक्षक आणि मध्यस्थ बनण्याची अवश्यकता आहे. युक्रेनला पाठिंबा देणे, हा खर्‍या ‘विश्‍वगुरु’साठी योग्य पर्याय आहे, असेही झापरोवा यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे बाजूला ठेवा ! – इमॅन्युअल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत. तेथे पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे बाजूला ठेवली पाहिजे.’ रशियाने त्याच्या शेजारील मित्र देश असलेल्या बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याच्या केलेल्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर मॅक्रॉन यांनी हे विधान केले.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले ! – जागतिक बँक

त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.