युक्रेनचा पाक आणि चीन यांचे नाव न घेता युक्रेनचा सल्ला
कीव (युक्रेन) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मानवतावादी साहाय्य मागितले आहे. भारताच्या भेटीवर असलेल्या युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा यांनी एका बैठकीत हे पत्र भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना दिले. तसेच त्यांनी भारताला चीन आणि पाकिस्तान यांचे नाव न घेता सल्ला देतांना म्हटले की, भारताने अशा शत्रूंना ओळखले पाहिजे ज्यांना वाटते की, आपण चुकीचे करून सुटू शकतो.’
एमिन जापारोवा ने कहा कि भारत उन दुश्मनों को पहचाने जो सोचते हैं कि वह कुछ भी गलत करके बच निकल जाएंगे#Ukraine #EmineDzhaparova https://t.co/zgMK4vUxGI
— DNA Hindi (@DnaHindi) April 11, 2023
येथे आयोजित परिषदेला संबोधित करतांना एमीन झापरोवा म्हणाल्या की, चीन आणि पाकिस्तान यांच्या समवेत भारताचे संबंध वाईट झाले आहेत. क्रिमियामध्ये जे घडले त्यातून भारताने धडा घेतला पाहिजे. जेव्हा काही चूक होते, तेव्हा ती थांबवली नाही, तर ती मोठी समस्या बनते.
युक्रेन भारताला सल्ला देण्याच्या स्थितीत नाही !
झापरोवा यांनी भारत-रशिया तेल कराराचा संदर्भ देत स्पष्ट केले की, युक्रेनने इतर देशांशी संबंध कसे राखले पाहिजेत, हे भारताला सांगण्याच्या स्थितीत नाही. खरे तर युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. असे असतांनाही भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत असून या माध्यमातून स्वतःच्या नागरिकांना दिलासा देत आहे.
आम्हाला भारतासमवेत चांगले संबंध हवे आहेत !
उप परराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा म्हणाल्या की, आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ३ वेळा मॉस्कोला गेले. ते युक्रेनमध्ये आले, तर त्यांचे स्वागत आहे. त्यांनी युक्रेनला यावे, अशी आमची इच्छा आहे. (भारताने ३७० कलम रहित केल्यावर युक्रेनने सुंक्त राष्ट्रांमध्ये त्याच्या विरोधात भूमिका घेतली. अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा देशासोबत भारत चांगले संबंध कसे प्रस्थापित करील ? – संपादक)
संपादकीय भूमिकाभारताच्या शत्रूंचे जाऊ दे, युक्रेनने त्याच्या मित्रांना तरी ओळखले आहे का ? अमेरिका आणि युरोपीय देश यांच्या भरोशावर युक्रेनने रशियाशी दोन हात केले. त्याचे परिणाम आज तो भोगत आहे. त्यामुळे भारताला हा सल्ला देण्यासह युक्रेनने ‘त्याचे मित्रदेश कोण आहेत ?’, हे प्रथम ओळखावे ! |