गोव्यात २४ घंट्यांत आगीसंबंधी ७९ घटना
राज्यात नोंद झालेल्या एकूण ७९ घटनांपैकी ७० घटना या गवत किंवा बागायती यांना आग लागण्यासंबंधी होत्या, तर उर्वरित ९ घटना या अन्य स्वरूपाच्या होत्या.
राज्यात नोंद झालेल्या एकूण ७९ घटनांपैकी ७० घटना या गवत किंवा बागायती यांना आग लागण्यासंबंधी होत्या, तर उर्वरित ९ घटना या अन्य स्वरूपाच्या होत्या.
नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे.
पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे अपघातांची मालिका चालूच ! स्मार्ट सिटीच्या कामामुळे ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना ताजी असतांनाच १० फेब्रुवारी या दिवशी मालवाहू टँकर रस्त्याच्या शेजारी खोदलेल्या चरात कलंडला. या वेळी सुदैवाने टँकरचा चालक आणि साहाय्यक वाचले.
या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार राजापूर पत्रकार संघाच्या वतीने निषेध करत आहोत. या अपघात प्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांची सखोल चौकशी करून दोषी आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी आणि वारीशे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.
या घटनेवरून आणखी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे समाजाची विरोध पचवण्याची शक्ती न्यूनतम झाली आहे. एखादे सूत्र चिघळत ठेवणे, तसेच एखाद्या सूत्रावरून भावना भडकावत रहाणे, याचा परिणाम कुठल्या थराला जाऊ शकतो ? हेही यावरून लक्षात येते.
पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले असून जो कुणी आहे, तो रिफायनरी समर्थक असूदे किंवा रिफायनरी समर्थक नसूदे, योग्य तो न्याय दिला जाईल.
शहरातील काँग्रेसनगरकडून धंतोली पोलीस ठाण्याकडे जाणार्या मार्गाने दुचाकीवरून शीतल यादव (वय ४२ वर्षे) जात होत्या. त्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहतूक पिकअप व्हॅनच्या चालकाने बाहेर न पहाता वाहनाचा दरवाजा उघडला.
सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो. हा योगायोग असू शकत नाही. हा ठरवून घडवून आणलेला घातपात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.
जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत असून गेल्या ६ मासांच्या कालावधीत नाशिक शहर आणि जिल्ह्यात ६०२ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
दोन वैमानिक घायाळ, तर दोन वैमानिक बेपत्ता !