हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी
यवतमाळ, ११ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे नेते, तसेच खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. ‘राहुल गांधी यांनी हिंदु समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त माफी मागावी. राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला केल्याने त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी’, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्यामार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे मनोज औदार्य, विनोद अरेवार, ‘सावरकर विचार मंचा’चे श्रीकांत शास्त्रीकर, सनातन संस्थेचे सुधाकर कापसे, हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे, राम धारणे, सुधीर गोसावी उपस्थित होते.