हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर
सोलापूर – संसदेतील विरोधीपक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी स्वीकारले. या प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, हिंदुत्वनिष्ठ श्री. किशोर पुकाळे, श्री. राजेंद्र पलनाटी, श्री. लक्ष्मीनारायण बामनला, कर सल्लागार श्री. गणेश वास्ते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.
फलटण (जिल्हा सातारा) – याविषयीचे निवेदन येथील प्रशासनालाही देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार श्री. काळे यांनी स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी श्री. मंगेश खंदारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रदीप जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.