वणी (यवतमाळ), १४ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूंना हिंसाचारी ठरवल्याने देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली. या विषयीचे निवेदन वणी येथील स्थानिक नायब तहसीलदारांना देण्यात आले.