आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, असा अपप्रचार ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

‘आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही व्यापार्‍यांना घालून संपूर्ण सांगलीच्या विकासालाच स्थगिती देण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत.’

भिगवण (पुणे) येथे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद, १७ गोवंशियांची सुटका

नेहमीच गोवंशियांच्या कत्तलीसाठी वाहन जात आहे, याची माहिती पोलिसांच्या अगोदर गोरक्षकांना कशी काय मिळते ? हा प्रश्‍न अनुत्तरितच रहातो. पोलिसांनी याविषयी उपाययोजना काढावी, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील २ आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद ठेवा ! – जयंत पाटील, पालकमंत्री

गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

सातारा येथे होणार ‘जिल्हा पालक संघा’ची स्थापना ?

कोरोनाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील खासगी शाळांची दादागिरी वाढत आहे. शाळांच्या त्रासाला कंटाळून सातारा येथील पालकांनी संघटित होत लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे ठरवले आहे.

सांगली महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ‘आय.एस्.ओ. ९००१’ प्रमाणपत्र प्राप्त !

‘आय.एस्.ओ. ९००१’ हे प्रमाणपत्र पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते २३ मार्च या दिवशी आयुक्त नितीन कापडणीस यांना प्रदान करण्यात आले.

रेठरे बुद्रुक सोसायटीच्या खत विभागात २३ लाख रुपयांचा अपहार !

तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी नीतीवान समाज निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी धर्मशिक्षण द्यायला हवे !

कोल्हापूर महापालिकेचा ६२३ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प संमत

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, संवर्धन यांसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम चालू

सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी यांची वसुली करण्यासाठी नगरपरिषद पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करत आहेत.

वाढे फाटा परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ !

वाढे फाटा ते वेण्णा नदी पूल या अंतरामध्ये लुटमारीच्या घटना वाढत आहेत. १९ मार्चच्या रात्री संतोष उबाळे यांना ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून भ्रमणभाष, रोख रक्कम आणि पॅन्ट काढून घेतली.