भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराचा सातारा जिल्हाभर जाहीर निषेध

महाविकास आघाडी सरकारचे विचार एक नाहीत. हे सरकार शेतकर्‍यांसाठी मारक आहे. राज्याचे गृहमंत्री पोलिसांनाच १०० कोटी रुपयांचा हप्ता मागत असतील, तर हे भ्रष्ट सरकार सत्तेत रहाता कामा नये.

धामणी (जिल्हा सातारा) येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे घर जळून खाक

पाटण तालुक्यातील धामणी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे डोंगरावर रहाणार्‍या एकनाथ बाबूराव नायकवाडी यांचे घर जळून खाक झाले आहे.

१ वर्षानंतर सातार्‍यातील राजवाडा येथील चौपाटी चालू होणार

या चौपाटीमुळे अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालत होता. त्यामुळे या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यावर पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता, गर्दी आदींचे कारण देत चौपाटी चालू करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.

पाटण (जिल्हा सातारा) येथील ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटीलेटर’वर !

या रुग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक आणि ३ वैद्यकीय अधिकारी अशा किमान ३ आधुनिक वैद्यांची प्रशासकीय तरतूद आहे; मात्र यापैकी येथे कुणीही नाही.  रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात आलेले केवळ दोनच आधुनिक वैद्य आहेत.

लसीकरणासाठी सातारा जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा सक्षम !

राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उपाय म्हणून शासनाने लसीकरणाचा दुसरा टप्पा चालू केला आहे. सातारा जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम अत्यंत प्रभावीपणे चालू असून लसीकरणासाठी जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा सक्षम आहे,

पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी पाठवले गेले गुरांचे खाद्य

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शाळा ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यान्ह भोजन योजनेचा भाग आहे. विद्यार्थ्यांना अन्न वाटप करण्याचे दायित्व पुणे महानगरपालिकेचे आहे. त्यात उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे.

कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्याने कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

कोरेगाव शहरातील विविध व्यावसायिक, ग्राहक, तसेच प्रवासी यांनी ‘मास्क’ लावले नाही, म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहापूर तालुक्यातील माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवकालीन तलावाचे सुशोभीकरण होणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले माहुलीच्या पायथ्याशी असलेल्या माहुली गावातील शिवकालीन तलावातील गाळ काढण्याचे आणि तलाव सुशोभित करण्याचे काम इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४ या जागतिक महिला संस्थेच्या माध्यमातून होणार आहे.

अनधिकृत टपर्‍या हटवा, अन्यथा ५०० टपर्‍या उभारण्यासाठी अनुमती द्या ! – शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

अतिक्रमणासमवेत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे चालू आहेत. यासाठी पालिकेची कोणतीही अनुमती घेतली जात नाही. बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच इतस्त: पडलेले असते. कामात हयगय करणार्‍या भागनिरीक्षकांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.

वाई (जिल्हा सातारा) येथील तहसीलदारांचे आदेश धुडकावणार्‍या तलाठ्यांवर कारवाई !

तहसीलदारांनी तलाठी कुंभार यांना वाळू चोरीच्या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार टाकलेल्या धाडीत चोरलेली वाळू आणि साहित्य कह्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.