संभाजीनगर येथील १० चौकांत मनसेच्या फलकाजवळ शिवसैनिकांनी लावले फलक !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरा होणे नाही’, असे फलक युवा सेनेकडून शहरातील प्रमुख १० चौकांत लावले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुसलमान समाजासाठी ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

एकीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे भोंग्यावरून कणखर भूमिका घेत असतांना सांगली शाखेकडून ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन आश्चर्यकारक आहे !

संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेला २ सहस्र पोलिसांचा वेढा !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशी होणाऱ्या बहुचर्चित सभेला २८ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पोलिसांनी १५ अटींसह अनुमती दिली आहे. त्यासाठी आयुक्तालयात सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमान ३ बैठका झाल्या.

मशिदींवरील भोंगे उतरवल्याविषयी योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन !

उत्तरप्रदेशमध्ये ११ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ सहस्रांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

हनुमान चालिसावरून देशात अग्नी प्रज्वलित झाला आहे ! – बाळा नांदगावकर, नेते, मनसे

राज ठाकरे यांच्या एका भाषणामुळे देशातील नेत्यांमध्ये हिंदुत्वाचा अग्नी प्रज्वलित झाला आहे. राज ठाकरे बोलायला लागले अन् नास्तिक लोक आस्तिक झाले. देवळात जाऊ लागले, तसेच आंदोलन करायला लागले. हनुमान चालिसावरून देशात अग्नी प्रज्वलित झाला आहे.

राज ठाकरेंच्या संभाजीनगरमधील सभेला अनुमती मिळणारच ! – बापू वागस्कर, राज्य सरचिटणीस, मनसे

संभाजीनगर येथे १ मे या दिवशी होणार्‍या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्य सरकार अनुमती देईलच आणि नाही दिली तरी आपण न्यायालयातून अनुमती आणू.

संभाजीनगर येथे राज ठाकरे यांच्या सभेची ठरलेल्या जागीच जय्यत सिद्धता !

२४ एप्रिल या दिवशी येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील व्यासपिठाची मनसैनिकांकडून विधीवत् पूजा करण्यात आली. त्यानंतर आता सभेसाठी सिद्धता करण्यात येत आहे.

(म्हणे) ‘दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे यांनी क्षमा मागावी !’ – तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे यांची मागणी

आतापर्यंत खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल केल्याविषयी कोकाटे यांनीच समस्त हिंदूंची क्षमा मागायला हवी !

संभाजीनगर येथे भोंगे लावायचे असतील, तर कायदेशीर अनुमती घ्यावी ! – पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेश

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले की, ध्वनीक्षेपकाच्या संदर्भात वर्ष २००५ मध्ये सर्वाेच्च न्यायालय आणि राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे, त्यानुसार अनुमतीविना ध्वनीक्षेपक लावता येत नाही.

मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणारच ! – दिलीप दातीर, नाशिक शहराध्यक्ष, मनसे

मशिदींवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे.