जालना – शासकीय पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा कळस गाठणारा अंबड (जिल्हा जालना) येथील तहसीलदार विजय चव्हाण अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (‘एसीबी’च्या) जाळ्यात अडकला आहे. ६ जूनला चव्हाण याला लाच घेतांना अटक करण्यात आली. न्यायालयाने लाचखोर चव्हाण याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. भ्रष्ट तहसीलदार विजय चव्हाण याने लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तब्बल ८ वेळा त्याचे ठिकाण पालटले होते. लाचखोर तहसीलदाराच्या अटकेनंतर ७ जूनला ‘एसीबी’च्या पथकाने त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील उच्चभ्रू भागातील निवासस्थानी धाड घातली. येथे स्वतःच्या नावावर एक ‘रो-हाऊस’ (एकमजली घर) आणि एक आलिशान फ्लॅट, १ लाख ८ सहस्र ८०० रुपयांची रोकड, ९ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० ग्रॅम चांदी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे धास्तावलेल्या अंबड तालुक्यातील वाळूतस्करांनी ७ जूनला गोदापट्ट्यात अघोषित बंद पाळला. अनुमाने २०० ‘हायवा ट्रक’ एका दिवसासाठी पूर्णपणे बंद होते.

सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर