पिंपरी (पुणे) येथील श्री तुळजाभवानी मंदिरातून देवीचा चोरीला गेलेला मुकुट परत मिळाला !

पिंपरी (जिल्हा पुणे) – तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील श्री तुळजाभवानी मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून आणि तांत्रिक अन्वेषणाच्या आधारे अन्वेषण पथकाने आरोपींचा शोध घेत रवि जटाशंकर सोनी आणि रमेश श्रीराम सोनी (मूळ उत्तरप्रदेशचे) या चोरांना अटक केली. त्यांच्याकडून १ किलो ३०० ग्रॅम वचनाचा चांदीचा मुकुट हस्तगत केला. मंदिर विश्वस्त बाळासाहेब शिळीमकर यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
आरोपींकडून हस्तगत केलेला देवीचा मुकुट पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी मंदिरांच्या विश्वस्तांकडे सुपुर्द केला आहे. चोरांनी मुकुट चोरल्यानंतर आकुर्डी येथील नातेवाइकांकडे ठेवून ते उत्तरप्रदेश येथील मूळ गावी पळून गेले होते. (मंदिरात चोरी करणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर