रेल्वेच्या ६५ पायाभूत सुविधांच्या कामांना मान्यता

मुंबई – ‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’च्या (‘महारेल’च्या) माध्यमातून करण्यात येणार्या एकूण १३१ पैकी पहिल्या टप्प्यात ६५ कामांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘महारेल’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे ‘फाटकमुक्त’ होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक झाली.
मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात एकाही रेल्वेमार्गावर फाटक रहाता काम नये. ‘रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रा’साठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, तसेच महानगरांमध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता तेथे नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात यावीत.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !