शीव-पनवेल द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी
मुंबई – वर्दळीचे ठिकाण असलेल्या दादरमधील प्लाझा येथे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या चालकाने बसवरचे नियंत्रण सुटल्याने २ दुचाकी आणि दोन टॅक्सी यांना धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला असून १३ जण घायाळ झाले आहेत. सकाळी ९.३० वाजता हा अपघात झाला. या अपघातामुळे शीव-पनवेल द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. या अपघातात वाहनांची प्रचंड हानी झाली आहे. या बसने वाहनांना धडक दिल्यानंतर ती बाजूला चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी लावलेल्या दुभाजकांवर आदळली. या वेळी तेथील बुलडोझरचा भाग बसच्या काचेवर आदळल्याने बसचीही हानी झाली. यात बसचालकाला दुखापत झाली असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार चालू आहेत.

तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री
देशात अमली पदार्थविरोधी मोहीम चालू असून पाळेमुळे खणून काढणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !