धर्मशास्त्रानुसार लेपन न केल्यास तीव्र जनक्षोभाची चेतावणी !

पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या येथील श्री विठ्ठलमूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने पुन्हा एकदा रासायनिक लेपन किंवा स्टोन पावडर (दगडाची भुकटी) पद्धतीचा घाट घातला आहे. ‘कोरोना महामारीच्या काळात केलेले रासायनिक लेपन ८ ते १० वर्षे टिकेल’, असा दावा करण्यात आला होता; मात्र ४-५ वर्षांतच मूर्तीला पुन्हा लेपनाची आवश्यकता भासल्याने ही प्रक्रिया सदोष असल्याचे सिद्ध झाले आहे. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा धोका असतो. त्यामुळे रासायनिक आणि विघातक प्रक्रियांना तातडीने स्थगिती देऊन वारकरी संत-महंत, जाणकार यांचे मार्गदर्शन घेऊन धर्मशास्त्रानुसार लेपन करावे, अन्यथा तीव्र जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. मूर्ती संवर्धन हा विषय कोट्यवधी भक्तांची श्रद्धा आणि आध्यात्मिक भावना यांच्याशी जोडलेला आहे. संवर्धनासाठी कृत्रिम रसायने किंवा स्टोन पावडरमधील रासायनिक बाइंडर्स (दोन पदार्थांना बांधून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक घटक) न वापरता प्राचीन आगम ग्रंथ आणि हिंदु धर्मशास्त्रातील उपाययोजना यांचा विचार करावा.
२. देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान आणि धुळे येथील राम मंदिर येथे नैसर्गिक प्रक्रियांनी मूर्तींचे संवर्धन झाले आहे.
३. ‘मूर्तीची झीज होते’, हे कारण पुढे करून शेकडो वर्षांची परंपरा असलेला श्री विठ्ठलाचा ‘चरणस्पर्श’ किंवा ‘अभिषेक’ यांवर कोणत्याही प्रकारची बंदी आणणे अथवा निर्बंध लादणे, हा यावरील उपाय असू शकत नाही.
४. मूर्तीविषयीचा निर्णय बंद खोलीत घाई-गडबडीत न घेता वारकरी संप्रदायातील संत-महंत, शंकराचार्य, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार यांच्या मार्गदर्शनाखालीच घेण्यात यावा. हा विषय महाराष्ट्राच्या धार्मिक अस्मितेचा असल्याने प्रशासनाने सर्व आक्षेपांचे निरसन करूनच पावले उचलावीत. कोट्यवधी भाविकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून एकतर्फी निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र जनक्षोभ निर्माण होऊ शकतो.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !