
पुणे – पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यास ६० टक्के शेतकर्यांनी संमती दिली आहे. भूसंपादनासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. विमानतळासाठी ७ गावांतून भूसंपादन करणार असून भूसंपादनाचा अंतिम दरही निश्चित केला आहे. प्रकल्पबाधित शेतकर्यांना प्रतिएकर किमान १ कोटी ६१ लाख रुपये मिळणार आहेत. भूमीच्या मूळ दराच्या चौपट दरानुसार सरासरी प्रतिएकर २ कोटी रुपयांची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ७ मे पासून भूसंपादन करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रारंभ केला असून शेतकर्यांच्या खात्यात कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मोबदल्याची रक्कम जमा होईल. येत्या १० जूनपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येईल, असे जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ