संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेत नियमांचा भंग; दोषारोपपत्र प्रविष्ट होणार !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे

संभाजीनगर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशी झालेल्या सभेत नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात येत आहे. त्याविषयी आयोजक राजीव जेवळीकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या गुन्ह्यात जामीनदारासह न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. १ मे या दिवशी राज ठाकरे यांनी सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे सभा घेतली. पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक समाधान इंगळे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर आरोपाविषयी सबळ पुरावे आढळून आले. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट होत असल्याची नोटीस आयोजक राजीव जेवळीकर यांना बजावण्यात आली आहे.