सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !

    नाशिक – येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. या पार्श्वभूमीवर भूमींच्या संदर्भातही मोठी गुंतवणूक केली जात आहे. स्थानिकांनी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी त्यांच्या जागेचे रूपांतर हॉटेल किंवा निवास व्यवस्था यांमध्ये करण्याचे योजले आहे. त्यामुळे येथील भूमींचे दर पुष्कळ वाढले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे २५ ते ३० लाख रुपये गुंठा दराने जागा मिळत असल्याचे स्थानिक सांगतात. दोन वर्षांपूर्वी हेच दर १० ते १२ लाख रुपये प्रति गुंठा होते.

नाशिक, जळगावसह स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी जानेवारीपासून आतापर्यंत नगरपालिकेकडे १६० गृह प्रकल्पांचे प्रस्ताव दिले आहेत. त्यापैकी ५७ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.