
पणजी, ८ जून (वार्ता.) – जागतिक स्तरावर विविध आव्हाने असूनही मागील १ वर्षात गोव्यातून झालेल्या अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गोवा छोटे राज्य असले, तरी औषधे, रसायने, नौवहन उद्योग (शिपिंग) आणि अभियांत्रिकी उत्पादन यांच्या निर्यातीमध्ये गोव्याचे मोठे योगदान आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पणजी येथे ८ जून या दिवशी वाणिज्य खात्याच्या वतीने आयोजित अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु, खात्याचे सहसचिव विमल आनंद, आदी अधिकार्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पर्यटनासमवेतच गोवा इतर उद्योगांमध्येही पुढे येत आहे. वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात गोव्याहून ४० कोटी ८0 लाख डॉलर्स (३८ अब्ज ९७ कोटी ५६ लाख रुपये) किमतीच्या अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात झालेली आहे. वर्ष २०२५-२६ मध्ये यामध्ये वाढ होऊन ५५ कोटी डॉलर्स (५२ अब्ज ५३ कोटी ८० लाख रुपये) उत्पादनांची निर्यात झाली आहे. गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास, कुशल मनुष्यबळ आणि गोव्यातील सुधारित औद्योगिक क्षेत्र यांमुळे हे शक्य झाले आहे. नौवहन उद्योग (शिपिंग) आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीमध्ये पश्चिम विभागामध्ये गोवा आघाडी घेत आहे. गोवा सरकार औद्योगिक क्षेत्रासाठी निरनिराळ्या योजना आणत आहे. समुद्रमार्गे निर्यातीमध्ये वाढ होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकार हरित उद्योगांना प्रोत्साहन देते. भाजप सरकारच्या काळात चालू केलेल्या ‘मेक इन इंडिया’, ‘ग्रो इन इंडिया’,‘स्टार्ट अप’,‘मुद्रा कर्ज योजना’, अशा निरनिराळ्या उपक्रमांमुळे औद्योगिक क्षेत्र आघाडीवर आहे. याच्यासाठीच मागील १२ वर्षे देशातील निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे. मागील एका आर्थिक वर्षात देशातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.’’ माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातल्या निर्यातदारांनी पारंपरिक बाजारांसमवेतच नवीन बाजार शोधणे आवश्यक असल्याचे म्हटले.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ