आधुनिक वैद्याची लवकर भेट व्हावी, म्हणून बनाव

पुणे – पोलिसांचा गणवेश परिधान करून तोतया पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करणार्या समिना आफिस इनामदार उपाख्य समिना आयुब पठाण या २५ वर्षीय मुसलमान महिलेला लष्कर पोलिसांनी अटक केली. एका खासगी रुग्णालयातील आधुनिक वैद्याची भेट लवकर व्हावी म्हणून बनावट पोलीस बनून ती आली होती, असे उघड झाले. आरोपी महिला ६ जून या दिवशी ‘व्हिक्टरी चित्रपटगृहा’समोरील एका खासगी रुग्णालयात आली होती. त्याच वेळी साहाय्यक फौजदार शिंदे हे वैद्यकीय पडताळणीसाठी गेले होते. शिंदे यांना पाहिल्यानंतर आरोपीने त्यांच्याकडे कोणत्या पोलीस ठाण्यात आहात ? अशी विचारणा केली.
शिंदे यांना आरोपीने घातलेल्या गणवेशावर ‘नेमलेप्ट’ (नावाची पाटी) चुकीची असल्याने संशय आला. त्यांनी आरोपीकडे विचारणा केली आणि सदर घटना लष्कर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचार्यांना सांगितली. त्यांनी येऊन आरोपीकडे चौकशी केली असता बनाव उघड झाला.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक