अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !

‘हिंदु एकता आंदोलना’च्या सांगली शहराध्यपदी नियुक्ती झाल्यावर अनिरुद्ध कुंभार (डावीकडे) यांचा सत्कार श्री. नितीन शिंदे

सांगली, ८ जून (वार्ता.) – येथील खंदे आणि क्रियाशील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’ संघटनेच्या सांगली शहराध्यक्षपदी जाहीर निवड करण्यात आली आहे. ७ जूनला हिंदु एकता आंदोलन कार्यालय, कोल्हापूर येथे संघटनेची अत्यंत महत्त्वाची प्रांतिक बैठक पार पडली. या बैठकीत एकमुखाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. श्री. कुंभार यांच्या निवडीमुळे सांगली आणि परिसरात हिंदुत्वाचे कार्य अधिक आक्रमक आणि प्रभावीपणे वाढेल, असा विश्वास हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त केला जात आहे. श्री. अनिरुद्ध कुंभार हे गेल्या ३ वर्षांपासून ‘हिंदु एकता आंदोलन’ संघटनेमध्ये अत्यंत सक्रीयपणे धर्मकार्यात सहभागी आहेत. हिंदूंच्या संघटनासाठी आणि धर्मरक्षणासाठी त्यांनी सदैव तत्परतेने काम केले आहे.