ठाणे येथे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वे पोलिसाने वाचवला जीव !

ठाणे, १३ मे (वार्ता.) – रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान एक तरुण रेल्वे रूळ ओलांडत असतांना समोरून लोकलगाडी आली. हा थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. रेल्वे रूळ ओलांडतांना त्याचा अंदाज चुकल्याने त्याला रेल्वेची गती समजली नाही. त्यामुळे तो स्तब्ध झाला. याच वेळी तेथे कर्तव्य बजावणारे रेल्वे पोलीस शिपाई तुषार सोनताटे यांनी तरुणाचा जीव वाचवला. क्षणाचा विलंब झाला असता, तर त्याला रेल्वे अपघातात त्याचा जीव गमवावा लागला असता. त्याचा जीव वाचवणाऱ्या पोलीस शिपायाचे कौतुक करण्यात येत आहे. (स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तरुणाचा जीव वाचवणारे रेल्वे पोलीस शिपाई तुषार सोनताटे यांचे अभिनंदन ! – संपादक)

सौजन्य : in 24 News यू ट्यूब

संपादकीय भूमिका

असे सतर्क आणि तत्पर रेल्वे पोलीस सर्वत्र हवेत !