बंगालमध्ये ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीवर अज्ञातांकडून दगडफेक  

मालदा (बंगाल) येथे ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली. कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. त्यामुळे ‘सी-१३’ डब्याची हानी झाली.

कर्नाटकातील कलबुर्गी रेल्वे स्थानक हिरव्या रंगाने रंगवल्यामुळे हिंदु संघटनांचा विरोध !

रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करतांना ‘त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही ना ?’ किंवा ‘त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ना ?’, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे अपेक्षित आहे.

‘निजामुद्दीन एक्सप्रेस’चे नामकरण ‘ताराराणी एक्सप्रेस’ असे करण्याची राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद संघटनेची निवेदनाद्वारे मागणी !

राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद यांच्या वतीने करवीर राज्य संस्थापिका महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

नागपूर येथे ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

मुंबई-नागपूरला जोडणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

पुण्यात भुयारी मार्गावर ‘मेट्रो’ची पहिली यशस्वी चाचणी !

येथील भूमीगत मेट्रोच्या पहिल्या ३ कि.मी. टप्पा असलेल्या मार्गावर ७ डिसेंबर या दिवशी पहिली चाचणी पार पडली. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली.

कोकण रेल्वेमार्गावर भावनगर- कोचुवेल्ली रेल्वेगाडी ‘एल्.एच्.बी.’ अत्याधुुनिक डब्यांसह धावणार !

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी ‘१९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर’ या रेल्वेगाडीत आता आरामदायक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एल्.एच्.बी. (लिंक हॉफमॅन बुश) डबे (कोच) असणार आहेत.

कोकणरेल्वे मार्गावर धावणार ४ विशेष गाड्या !

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे विभागाने कोकण रेल्वे मार्गावर ४ हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात जाणार्‍या पर्यटकांची संख्या पुष्कळ वाढली आहे.

अमली पदार्थ तस्करी करणार्‍या रेल्वे पोलीस दलातील अधिकार्‍यासह शिपाई बडतर्फ !

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची ?, अशी स्थिती झालेले पोलीस दल !

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील १० धार्मिक संस्थांना १५ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याची रेल्वे प्रशासनाची नोटीस !

पुणे रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांसाठी वापरल्या जाणार्‍या परिसरात असलेल्या मोकळ्या जागा अतिक्रमण करणार्‍यांकडून परत घेण्याचा रेल्वेला पूर्ण अधिकार आहे.

‘युटीएस् ॲप’द्वारे आता ५ किलोमीटर अंतरापर्यंतचे तिकीट घेण्याची सुविधा !

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ‘यूटीएस् मोबाईल ॲप’द्वारे तिकीट आरक्षित करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणून उपनगरीय तिकिटांसाठी अंतराची मर्यादा २ किलोमीटरवरून ५ किलोमीटर करण्यात आली आहे