उदयपूर-अहमदाबाद रेल्वे रुळावर स्फोट : दारुगोळाही आढळला

उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्ग स्फोटकांद्वारे उडवून देण्यात आला. या स्फोटामुळे रुळ दुभंगले गेले. येथे दारुगोळाही सापडला आहे. विशेष म्हणजे स्फोटाच्या ४ घंटे पूर्वी या रुळावरून एक रेल्वे गाडी गेली होती. ‘स्फोटाचा आवाज फार मोठा होता’, असे स्थानिकांनी सांगितले.

दक्षिण भारतातील पहिल्या ‘वन्दे भारत’ रेल्वेला पंतप्रधानांकडून हिरवा कंदिल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण भारताच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी बेंगळुरू रेल्वे स्थानकावर म्हैसूर-चेन्नई वन्दे भारत रेल्वेला ११ नोव्हेंबर या दिवशी हिरवा कंदिल दाखवला. ही देशातील पाचवी आणि दक्षिण भारतातील पहिली वन्दे भारत रेल्वे आहे.

रेल्वे प्रवासात आता मिळणार सात्त्विक शाकाहारी जेवण !

रेल्वेने प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना प्रवासाच्या कालावधीत आता सात्त्विक शाकाहारी जेवण मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेचे आस्थापन ‘आय.आर्.सी.टी.सी.’ आणि ‘इस्कॉन’ ही आध्यात्मिक संस्था यांच्यामध्ये करार झाला आहे.

केंद्रशासनाकडून महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींच्या २२५ प्रकल्पांना संमती !

केंद्रशासनाने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प संमत केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ३ नोव्हेंबर या दिवशी राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधानांनी वरील माहिती दिली.

राज्यातील रेल्वेस्थानकांवरील कोट्यवधी रुपयांची शेकडो ‘वॉटर वेंडिंग मशिन’ बंद !

बहुसंख्य फलाटांवरील यंत्रे बंद पडली आहेत, याचा अर्थ ‘ही यंत्रे बंद पडली आहेत कि बंद पाडली गेली आहेत ?’, याविषयीचा संशय बळावतो. रेल्वेफलाटावरील पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या दुकानदारांचा यामागे हात आहे का ? याचाही शोध प्रशासनाने घ्यायला हवा !

रेल्वेगाड्यांमध्ये प्रति प्रवासी सामान नेण्याचा नियम निश्‍चित

रेल्वेगाड्यांमधील स्लीपर कोच, तसेच अन्य गाड्यांमध्ये टियर-२ सामान नेण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने नियम निश्‍चित केले आहेत. प्रवाशाच्या तिकिटानुसार त्याने न्यायच्या सामानाचे वजन निश्‍चित केले जाते आणि त्यानुसार रेल्वेगाडीमध्ये सामान नेले जाऊ शकते.

सोलापूर-देहली या मार्गावर नवीन रेल्वे धावणार !

ही गाडी हुबळी येथून २०६५७ या क्रमांकाने शुक्रवारी रात्री ११.५० वाजता निघेल आणि हजरत निजामुद्दीन स्थानकावर रविवारी सकाळी १०.४० वाजता पोचेल. तसेच हजरत निजामुद्दीन स्थानकावरून २०६५८ या क्रमांकाने रविवारी दुपारी ३.५५ वाजता सुटेल.

रेल्वेने पालटले तिकीट आरक्षणाचे नियम

रेल्वेने पालटलेल्या नियमांनुसार वापरकर्त्यांना तिकीट आरक्षण करण्यापूर्वी भ्रमणभाष क्रमांक आणि ‘ई-मेल आयडी’ यांची पडताळणी करून घ्यावी लागेल.

सिद्धेश्वर एक्सप्रेसला चाकांमधील घर्षणामुळे आग लागली !

गाडीमध्ये आग लागल्याची माहिती ‘आर्.पी.एफ्.’च्या सैनिकांना मिळताच श्री सिद्धेश्वर एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. आग आटोक्यात येईपर्यंत प्रवाशांना अन्य डब्यात हलवण्यात आले होते.

नवीन आष्टी-नगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नगर-बीड-परळी वैजनाथ या २६१ किलोमीटर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी-नगर ६६ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते.