पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना कह्यात घेऊन सोडले !

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांना फलटण येथील गुरुकुलमध्ये ठेवण्यात आले आहे. संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचानालयाने (ईडी) अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या कह्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा नामघोषांच्या गजरात भक्तीमय वातावरणात आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरात नेते आणि अधिकारी यांनी गाड्या आणल्या थेट ‘ॲथलेटिक्स ट्रॅक’वरून !

खेळाडूंच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपये व्यय करून बनवलेल्या ॲथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाडी घालतांना नेते आणि मान्यवर यांनी जराही विचार केला नाही का ? स्वार्थासाठी क्रीडासुविधांची हानी करू धजावणार्‍या अनिर्बंध लोकांना काय म्हणावे ?

पेट्रोल पंपावर पावणे ९ लाखांची चोरी करणार्‍या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई !

सय्यदनगर परिसरातील पेट्रोल पंपावरील रोकड बँकेत भरण्यासाठी नेतांना लूटमार करणार्‍या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली.

आंबिल-ओढ्यातील नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलक यांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माहिती कुठून मिळाली त्याचा काही पुरावा आहे का ? मला सगळे पुरावे द्या, ऑडिओ क्लिप द्या. मी स्वतः तक्रार करीन.

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिचे ९ वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त करून सुयश !

या यशाविषयी तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

देशी गायींच्या सहवासाने कोरोना संसर्गाला दूर ठेवता येत असल्याचा राज्यातील ३०० गोशाळांच्या पहाणीतील निष्कर्ष !

सरकारने आता राष्ट्रीय स्तरावर गोरक्षा, गोसंगोपन, तसेच पंचगव्य यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन करून सामान्य माणसांसाठी ते उपलब्ध करून दिले पाहिजे !

पुणे महापालिकेची २ कोटी रुपयांची बँक हमी जप्त करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश !

कचरा डेपोत २०० मेट्रिक टन कचरा प्रकिया प्रकल्प चालू करण्याच्या हालचाली चालू असल्याचे याचिकाकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्यावर नवीन कचरा प्रक्रिया चालू करणार नाही, असे निवेदन पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिले आहे.