लोणावळ्यातील प्रसिद्ध आधुनिक वैद्य खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा !

असुरक्षित महाराष्ट्र ! काही अंतरावर पोलीस ठाणे असतांनाही चोरी होणे, हे चोरांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते !

आधुनिक वैद्यांवर होणार्‍या आक्रमणाच्या निषेधार्थ आय.एम्.ए.च्या आधुनिक वैद्यांचे काळ्या फिती लावून काम !

जीव वाचवणार्‍या डॉक्टरांचे रक्षण करा, असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे.

पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या जायका प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता !

वर्ष २०१५ मध्ये प्रकल्पाचा करार झाला असतांना ६ वर्षे उलटली तरी अजून निविदा प्रक्रियेवर काम चालू आहे. त्यामुळे कामामध्ये टाळाटाळ होत असल्याचा संशय नागरिकांना आल्यास चूक ते काय ? या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून ते दोषी असल्यास त्यांना निलंबित करायला हवे !

गोपनीय माहितीद्वारे पुणे येथील महिलेच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र रुपये काढणार्‍या अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद !

ए.टी.एम्. कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली. या माहितीच्या आधारे तक्रारदाराच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र ८१० रुपये ऑनलाईनद्वारे काढून घेतले.

कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांची सिंहगडावर गर्दी !

‘सिंहगड पर्यटकांसाठी अजूनही बंद असल्याने नियम मोडून कुणीही गडावर गर्दी करू नये. अन्यथा गुन्हे नोंदवले जातील. तसेच सरकारचे आदेश पाळून सहकार्य करावे’, असे आवाहन वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांनी केले आहे.

उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करावा ! – पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी

सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी १६० मेट्रिक टन एवढी आहे. उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने आदेश दिला आहे.

उन्हाळ्यात सर्वाधिक वायूप्रदूषण असणार्‍या राज्यांतील १० ठिकाणांमध्ये पुण्यातील ३ ठिकाणांचा समावेश !

नैसर्गिक जंगले जाऊन इमारतींची जंगले वाढल्यामुळे वायूप्रदूषण वाढले आहे. सरकारने आतातरी ज्या ज्या कारणांमुळे वायूप्रदूषण वाढत आहे, त्यावर लवकरात लवकर उपाययोजना काढावी ही अपेक्षा !

कोरोना रुग्णांनी वाढीव देयकासंदर्भात पुणे महापालिकेशी संपर्क साधण्याचे आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन !

देयकांच्या लेखापरीक्षणासाठी महापालिकेने ३० रुग्णालयांत आपले कर्मचारी नियुक्त केले आहेत. या व्यतिरिक्त भरारी पथकेही सिद्ध करण्यात आली आहेत.

तोरणा गडासह इतर राज्य संरक्षित स्मारकांवर यापुढे कुणालाही मुक्काम करता येणार नाही !

तोरणा गडावरील तटबंदीच्या संवर्धन कार्यातील ३ फुटांचा काही भाग तसेच कोकण दरवाजा येथील भिंतीच्या काही भागास उपद्रवी पर्यटकांकडून हानी पोहोचवण्यात आली होती. याची नोंद घेऊन वेल्हा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता.

कोंढवा (पुणे) परिसरात हवेत तलवारी फिरवून दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

हप्तेवसुलीसाठी धर्मांधांच्या टोळीने हवेत तलवारी फिरवून कोंढवा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सलग २ दिवस चालू असलेल्या या प्रकाराचा स्थानिक नागरिकांनीच प्रतिकार करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.