पुणे – येथील युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिने इयत्ता ९ वीच्या वार्षिक परिक्षेत १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिला मराठी, संस्कृत, इंग्रजी, गणित, विज्ञान-तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्र या ६ विषयांत १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. दळणवळण बंदीमुळे ही परीक्षा ‘ऑनलाईन’ घेण्यात आली होती. कु. आर्या हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून ती येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये शिकत आहे. या यशाविषयी तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.