राहुल गांधी यांना न्यायालयामध्ये उपस्थित रहाण्यासाठी पतियाळा न्यायालयाकडून नोटीस !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण !

भोसरी (जिल्हा पुणे) येथे पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा मृत्यू

बांधकाम प्रकल्पासाठी तकलादू पद्धतीने उभारण्यात आलेली पाण्याची टाकी कामगारांवर कोसळली. यात ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ कामगार घायाळ झाले. टाकीच्या ढिगार्‍याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !

पुणे येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले.

बसखाली सापडून तरुणीचा मृत्यू !

दुचाकी घसरल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या युवतीच्या डोक्यावरून पी.एम्.पी. बसचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

पुणे शहरात बेकायदा पिस्तुले बाळगणार्‍यांच्या संख्येत वाढ !

ही स्थिती पोलिसांची अकार्यक्षमता दर्शवते ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कठोर प्रयत्न करणे आवश्यक !

Pune Bangladeshi Infiltrators Arrested : पुणे येथे २१ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

बांगलादेशी नागरिकांची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस कठोर  उपाययोजना कधी करणार ?

चारचाकीत सापडले २२ लाख रुपये !

पुणे येथील हडपसर रस्त्यावर नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका चारचाकी वाहनात २२ लाख रुपये सापडल. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर आक्रमण !

पोलीस असतांना चंदन चोरी करणारे पळून जातात, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! अशामुळे चंदन चोरीच्या घटना वाढणार नाहीत, तर काय होणार ?

पिंपरी (पुणे) येथे धर्मांधांकडून पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचे अपहरण !

सर्वच ठिकाणी वाढत असलेल्या धर्मांध गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्याने त्यांची गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. पोलिसांचा धाकही संपल्याचे लक्षण आहे.

दिवाळीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यांमध्ये दुप्पटीने वाढ !

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कुणाचा वचक नसणे संतापजनक !