हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्या वर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून १० सहस्र विनाशिरस्त्राण वाहनचालकांवर कारवाई !

शिरस्त्राणाविना दुचाकी चालवल्याच्या प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुण्यातील १० सहस्र वाहनचालकांवर कारवाई केली. यातून ४४ लाख ५७ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई ‘आर्.टी.ओ.’च्या ‘वायुवेग पथका’ने १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४..

वाहन चालवण्याचा पक्का परवाना काढण्यात पुणेकर ‘अनुत्तीर्ण’ !

एप्रिल २०२४ पासून २२ नोव्हेंबर या दिवसापर्यंत १ लाख ८३ सहस्र ५४७ जणांनी ऑनलाईन शिकाऊ परवाने प्राप्त केले आहेत; मात्र पक्का परवाना करण्याच्या चाचणीमध्ये केवळ ८५ सहस्र ५६० वाहनचालक उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे येथे शारीरिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या !

मुलांवर सुसंस्कार असणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते. भावी पिढी जर अशी होत असेल, तर राष्ट्राचे भवितव्य कसे असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

कात्रज भागातील सराफी पिढीवर दरोडा टाकण्याच्या सिद्धतेतील चोरटे पोलिसांच्या कह्यात !

कात्रज भागातील सराफी पिढीवर दरोडा टाकण्याच्या सिद्धतेत असणार्‍या चोरट्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्या समवेत असलेल्या ३ मुलांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या विद्यार्थ्याची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली !

हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील ३५ सहस्र रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली.

आळंदी (पुणे) येथे २७ नोव्हेंबर या दिवशी पुरातन रथातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा वैभवी रथोत्सव !

२५ नोव्हेंबरला श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यातील दिंडीची नगरप्रदक्षिणा आणि इंद्रायणी नदीत पांडुरंगाच्या पादुकांचे वैभवी स्नान हरिनाम गजरात झाले. आळंदीला यात्रेचे स्वरूप आले आहे. भाविकांची सोय चांगली झाली आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीमध्ये भक्तांची मांदीयाळी !

घंटानाद झाल्यानंतर दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत संजीवन समाधीवर ११ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पवमान विधीवत् अभिषेक करण्यात आला. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता.

पुणे येथे विद्या विकास विद्यालय प्रशाला येथे शिक्षक कार्यशाळा !

सहकारनगर येथे ‘संस्कृत विद्या मंदिरा’च्या विद्या विकास विद्यालय प्रशाला येथे २५ नोव्हेंबर या दिवशी ‘शिक्षक विद्यार्थी सुसंवाद समुपदेशन’ या विषयावर शिक्षक कार्यशाळा पार पडली.