मंदिरे, गड-दुर्ग आणि स्मारके यांचे जतन आणि संवर्धन शास्त्रोक्त अन् कालबद्धरित्या करण्यात यावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मंदिरे, गड-दुर्ग आणि संरक्षित स्मारके यांचे काम करतांना त्यांचे मूळ रूप, स्थानमाहात्म्य अन् इतिहास हे लक्षात घेऊन केले जावे.

चारधाम यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाची पडताळणी होणार !

संतांनी सांगितल्यानंतर निर्णय घेणार्‍या उत्तराखंड सरकारचे अभिनंदन ! हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र जिहादी आतंकवादी रचतात. हे लक्षात घेऊन सरकारने असामाजिक घटक यात्रेकरूंमध्ये मिसळून समाजविघातक कार्य करू नयेत, यासाठी स्वतःहून पावले उचलणे अपेक्षित आहे.

वाराणसीमध्ये अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण

सर्वोच्च न्यायालयाचा काही वर्षांपूर्वीचा आदेश असतांनाही सरकार, प्रशासन आणि पोलीस हे मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्यास टाळत आहेत. त्यामुळे आता हिंदू याला वैध मार्गानेच विरोध करत असतील, तर ते चुकीचे कसे ?

पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या गोव्यातील हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ

आक्रमणकारी पोर्तुगिजांच्या विरोधात मोहीम उघडणार्‍या भाजपच्या गोवा शासनाचे अभिनंदन ! गोव्याची मुक्तता होऊन ६० वर्षे झाली, तरी आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !

पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक

रामनवमीला उत्तरप्रदेशात दंगली तर दूर, साधा शाब्दिक संघर्षही झाला नाही ! – योगी आदित्यनाथ

‘दंगली रोखण्यासाठी आणि धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने जे केले’, असे अन्य राज्यांनीही करायला हवे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

हिंदु राष्ट्राची स्थापना हेच माझे एकमेव लक्ष्य ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

मी मृत्यूला घाबरत नाही. माझे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, असे प्रतिपादन येथील गोशामहल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी काढले.

जोतिबा डोंगर येथील प्राचीन विहिरीची ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने स्वच्छता !

पुढील मोहिमेत विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी साठवणूक होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’ कोल्हापूर प्रांताच्या वतीने विशाळगडावरील वाघजाईदेवीच्या मंदिर जिर्णाेद्धाराचे काम !

आम्हा सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर आम्हा सर्व शिवप्रेमींची असलेली निष्ठा. या निष्ठेपोटीच लोकवर्गणीतून आम्ही हे काम उभे केले.

कुतूबमिनार पूर्वीच्या विष्णु मंदिराचा ‘गरुड स्तंभ’ असल्याने ते हिंदूंकडे सोपवावे ! – विश्‍व हिंदु परिषद

मुळात अशी मागणीच करावी लागू नये, तर केंद्र सरकारने स्वतःहून याचा खरा इतिहास देशासमोर ठेवून हा ‘गरुड स्तंभ’ हिंदूंच्या नियंत्रणात द्यावा !