मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषद शिकवले जाणार !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषद शिकवले जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे एका कार्यक्रमात घोषणा केली. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, या ग्रंथांमध्ये मानवाला परिपूर्ण बवण्याची क्षमता आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये मुलांना या पुस्तकांचेही शिक्षण दिले जाईल.

संपादकीय भूमिका

असा निर्णय केंद्र सरकारने संपूर्ण देशातील सरकारी आणि अनुदानित शांळांसाठी घेतला पाहिजे. त्यासाठी वाटल्यास कायदाही बनवावा !